Sunday, December 20, 2015

Bajirao mastani in Nigeria

खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बाजीराव मस्तानी काल रिलीज झाला. यावेळी मात्र दोन सुपर स्टार असलेले मूवी एकाचवेळी रिलीज झाले. एक शाहरुख काजोल चा दिलवाले आणि दुसरा रणवीर दीपिकाचा बाजीराव मस्तानी.
भारताप्रमाणेच हे दोन्ही मूवी nigeria मध्येही रिलीज झाले. सिल्वर बर्ड मध्ये दिलवाले आणि shoprite मध्ये बाजीराव. शाहरुखचा मूवी म्हणजे नेहमीसारखाच असणार अशी शक्यता होती म्हणून बाजीराव बघण्याचा सर्वांचा निर्णय झाला.
कसा होता हा बाजीराव.
बाजीराव म्हणजे एका योध्याची एका वीराची प्रेमकथा. इतिहासातील अनेक अजरामर कथांपैकी एक. शाळेत असताना वाचलेला इतिहास आणि पुण्यात असताना प्रत्यक्ष स्थळांना भेटी दिल्यानंतरही इतका जवळचा न वाटलेला आज बाजीराव मनाला भावला. इतिहासामध्ये हाच बाजीराव काहीसा रंगेल आणि रंगेल चितारण्यात आला असल्यामुळं त्याच्यातील योद्धा आणि प्रेमवीर अशा दोन्ही बाजू कधी उलगडल्याच नाही.  ज्या विराबद्दल लिहायचं झालं तर एक पुस्तक होईल. ना. स. इनामदार यांच्या राऊ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे.
संजय लीला भन्साळी यांनी निर्माता, संगीत  आणि दिग्दर्शक अशा बहुविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. चित्रपट अप्रतिम असाच होता. कदाचित ज्यांना बाजीरावाचा इतिहास पूर्ण माहित नसल्यामुळे चित्रपट समजलाच नाही त्यांच्या तोंडून तरी निराशाच बाहेर पडत होती.
जमेच्या बाजू.
रणवीर दीपिका , प्रियांका चोप्रा यांच्या अप्रतिम भूमिका आहेत.
हा चित्रपट संजय लीला भन्साळी चा असल्यामुळे भव्य महाल, साजेसा कपडेपट आणि special effects चा भडीमार आहे. चित्रपटाचा मराठी बाज राखण्यात दिगदर्शकाने यश मिळवले आहे.
उणी बाजू.
अतिभव्य चित्रपट बनवण्याच्या नादात काहीसा मूळ गाभा विसरल्याचं जाणवतं. अनावश्यक गाणी मात्र नको होती. मूळ इतिहासात खूप फेरफार केल्याचं अनेकदा जाणवत. काशीबाईंचं सामान्य स्त्री प्रमाणे वागणं अतिशय खटकणारी गोष्ट. नानासाहेब पेशवा अजिबात जमला नाही.
सारांश
हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने बघावा असाच आहे. अनेकदा आपण हॉलिवूड च्या विरकथा असलेले चित्रपटासाठी गर्दी करतो. बाजीराव हा आपल्याच मातीत जन्मलेल्या एका धुरणधर वीराची प्रेमकथा आहे. बाजीराव मस्तानीच्या प्रेमासाठी एकदा तरी हा चित्रपट आवर्जून बघावा. 
हर हर महादेव!!!

Saturday, December 5, 2015

Keke Marwa / Marua - auto rickshaw in Nigeria




आपल्याकडे भारतात जे तीन चाकी वाहन रिक्षा किंवा ऑटोरिक्षा नावाने प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे Nigeria मध्ये हेच वाहन Keke Marwa/Marua नावाने ओळखले जाते. आपल्या मुंबई किंवा पुण्यात जशा काळ्या आणि पिवळ्या रंगामध्ये या रिक्षा  सरकारी परमिट घेऊन चालवल्या जातात त्याच धर्तीवर या रिक्षासही Nigeria सरकारकडून परमिट/ परवाना घ्यावा लागतो. येथे रिक्षा या पिवळ्या रंगामध्ये आढळतात. मुख्यतः या रिक्षा भारतातून बजाज कंपनीकडून आयात केल्या जातात.

येथील रिक्षावाले साधारणता 2 किलोमीटर साठी 100 नायरा भाडे आकारणी करतात. शहरामध्ये गरीब किंवा मध्यम वर्गीय लोक हि रिक्षा जवळपास प्रवासासाठी वापरातात. हे Nigeria तील सर्वात स्वस्त वाहन असून Nigeria च्या वाहतुकीमध्ये या रिक्षाचा महत्वाचं वाटा आहे.

Keke Marwa म्हणजे नेमकं काय?
मलाही ह्या नावाबद्दल कुतूहल वाटायचं. म्हणून एक दिवस रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षावाल्याला विचारलं. तर त्याने त्यामागील गोष्ट उलगडायला सुरुवात केली. सन 1990 मध्ये buba Marwa नावाच्या लष्करी राज्यपालाने हि रिक्षा nigeria मध्ये प्रवासासाठी उपलब्ध करून दिली म्हणून या रिक्षाला keke Marwa असं नाव पडलं.

Nigeria मध्ये हि रिक्षा गरीब वर्गासाठी उपयुक्त आणि उपजिविकेचं साधन आहे. येथील लोक या रिक्षाला मात्र आपल्या देशी स्टाईलने सजवतात. त्यावर काहींच्या बाही मोठ्या अक्षरात लिहितात. काही जण आपल्याकडे  जसं साईबाबा प्रसन्न लिहितात त्याचप्रमाणे येथेही अशीच काही वाक्य आढळतात. 

त्यातील मुख्य वाक्य
God is great
God forgives i don't
Without god nothing
Glory of god
Don't try me o

Ghana must go bag in Nigeria - घाना मस्ट गो बॅग इन Nigeria



वर्ष 1970. त्यावेळी घाना या देशाची अर्थव्यवस्था उतरणीला लागलेली होती. बेरोजगारी वाढलेली होती त्याचबरोबर वाढती महागाईचा  प्रश्न अधिक बिकट होता. त्याच वेळी शेजारील राष्ट्र Nigeria आर्थिक भरभराटीचा काळ अनुभवत होता. प्रचंड तेल साठा मिळाल्यानं अर्थव्यवस्था चांगलीच सुधारली होती.  रोजगरा निमित्त पश्चिम आफ्रिकेतून खूप लोक Nigeria मध्ये स्थलांतरित होत होते. त्यामध्ये मुख्यत्वेकरून Ghana नागरिकांचा समावेश होता.
सन 1980 च्या दरम्यान तेलाच्या किमती कमी झाल्याने आणि अन्य कारणामुळे  Nigeria ची अर्थव्यवस्था ढासळू लागली. त्यांचीही अर्थव्यवस्था काहीशी Ghana सारखीच होईल अशी शक्यता निर्माण झाली. 3 वर्ष उलटली पण अर्थ व्यवस्था सुधारण्याची लक्षण काही दिसेना. Nigeria मध्ये स्थलांतरितांचे लोंढे काही कमी होईनात.
सन 1983 मध्ये Nigeria सरकारने बाहेरील स्थलांतरित आणि घुसखोरांना हाकलून देण्याचं निर्णय घेतला. त्यामध्ये जवळपास 7 लाख Ghana नागरिकांचा समावेश होता. त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली.
Report
For BBC Announcement Click on Logo:  

सर्व नागरिक आपले सामान बांधण्यास सुरवात केली. त्यावेळी ते सामान नेण्यासाठी  एक विशिष्ट प्रकारची बॅग वापरत. त्याची याच प्रकारच्या बॅग ला प्रचंड मागणी येऊ लागली. हीच बॅग पुढे Ghana must go नावाने प्रसिद्ध झाली.
आजही 35 वर्षानंतर हि बॅग 'Ghana must go' बॅग नावाने Nigeria मध्ये बहुतांश दुकानामध्ये उपलब्ध आहे.







Sunday, November 15, 2015

Prem Ratan Dhan Payo in Lagos Nigeria

Prem Ratan dhan Payo in Nigeria
दिवाळी म्हणजे एक मौज, आनंद , उत्साह आणि बरंच काही. याच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रेम रतन धन पायो जगभर प्रदर्शित झाला. भारतामध्ये जवळपास 4500 स्क्रीन वर release झाला. प्रेम रतन धन पायो ने पहिल्याच दिवशी 40 करोडचा टप्पा पार केला. पहिल्याच दिवशी हा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. आणि बॉलीवूड मध्ये अभिनेता सलमान खानच्या नावावर हा विक्रम नोंदला गेला. हा नेहमी प्रमाणे suraj badjatya  यांनी दिग्दर्शित केला असून सलमान खान आणि सोनम कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.

नेहमी प्रमाणे आमच्याकडेही लागोस मध्येही प्रेम रतन चं जोरदार स्वागत झालं. पण काही मोजक्याच ठिकाणी (limited screens) प्रदर्शित झाला. 

चित्रपट बघून बाहेर आल्यानंतर काहीश्या  संमिश्र प्रतिक्रिया होत्या. काहींना हा चित्रपट अजिबात आवडला नव्हता. काहींना त्यातील भव्य सेट्स आवडले होते तर काहींना सलमान. यात मुख्य म्हणजे " शिशा महाल" स्वप्नांवत भासतो. हा फॅमिली चित्रपट असल्यामुळे एकदा पाहण्याजोगा आहे असं काहींच मत होतं.
चित्रपटाचं नाव - प्रेम रतन धन पायो
दिग्दर्शक -  सुरज बडजात्या
मुख्य भूमिका - सलमान, सोनम आणि अनुपम खेर