Sunday, December 20, 2015

Bajirao mastani in Nigeria

खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बाजीराव मस्तानी काल रिलीज झाला. यावेळी मात्र दोन सुपर स्टार असलेले मूवी एकाचवेळी रिलीज झाले. एक शाहरुख काजोल चा दिलवाले आणि दुसरा रणवीर दीपिकाचा बाजीराव मस्तानी.
भारताप्रमाणेच हे दोन्ही मूवी nigeria मध्येही रिलीज झाले. सिल्वर बर्ड मध्ये दिलवाले आणि shoprite मध्ये बाजीराव. शाहरुखचा मूवी म्हणजे नेहमीसारखाच असणार अशी शक्यता होती म्हणून बाजीराव बघण्याचा सर्वांचा निर्णय झाला.
कसा होता हा बाजीराव.
बाजीराव म्हणजे एका योध्याची एका वीराची प्रेमकथा. इतिहासातील अनेक अजरामर कथांपैकी एक. शाळेत असताना वाचलेला इतिहास आणि पुण्यात असताना प्रत्यक्ष स्थळांना भेटी दिल्यानंतरही इतका जवळचा न वाटलेला आज बाजीराव मनाला भावला. इतिहासामध्ये हाच बाजीराव काहीसा रंगेल आणि रंगेल चितारण्यात आला असल्यामुळं त्याच्यातील योद्धा आणि प्रेमवीर अशा दोन्ही बाजू कधी उलगडल्याच नाही.  ज्या विराबद्दल लिहायचं झालं तर एक पुस्तक होईल. ना. स. इनामदार यांच्या राऊ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे.
संजय लीला भन्साळी यांनी निर्माता, संगीत  आणि दिग्दर्शक अशा बहुविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. चित्रपट अप्रतिम असाच होता. कदाचित ज्यांना बाजीरावाचा इतिहास पूर्ण माहित नसल्यामुळे चित्रपट समजलाच नाही त्यांच्या तोंडून तरी निराशाच बाहेर पडत होती.
जमेच्या बाजू.
रणवीर दीपिका , प्रियांका चोप्रा यांच्या अप्रतिम भूमिका आहेत.
हा चित्रपट संजय लीला भन्साळी चा असल्यामुळे भव्य महाल, साजेसा कपडेपट आणि special effects चा भडीमार आहे. चित्रपटाचा मराठी बाज राखण्यात दिगदर्शकाने यश मिळवले आहे.
उणी बाजू.
अतिभव्य चित्रपट बनवण्याच्या नादात काहीसा मूळ गाभा विसरल्याचं जाणवतं. अनावश्यक गाणी मात्र नको होती. मूळ इतिहासात खूप फेरफार केल्याचं अनेकदा जाणवत. काशीबाईंचं सामान्य स्त्री प्रमाणे वागणं अतिशय खटकणारी गोष्ट. नानासाहेब पेशवा अजिबात जमला नाही.
सारांश
हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने बघावा असाच आहे. अनेकदा आपण हॉलिवूड च्या विरकथा असलेले चित्रपटासाठी गर्दी करतो. बाजीराव हा आपल्याच मातीत जन्मलेल्या एका धुरणधर वीराची प्रेमकथा आहे. बाजीराव मस्तानीच्या प्रेमासाठी एकदा तरी हा चित्रपट आवर्जून बघावा. 
हर हर महादेव!!!

No comments:

Post a Comment