Saturday, December 5, 2015

Keke Marwa / Marua - auto rickshaw in Nigeria




आपल्याकडे भारतात जे तीन चाकी वाहन रिक्षा किंवा ऑटोरिक्षा नावाने प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे Nigeria मध्ये हेच वाहन Keke Marwa/Marua नावाने ओळखले जाते. आपल्या मुंबई किंवा पुण्यात जशा काळ्या आणि पिवळ्या रंगामध्ये या रिक्षा  सरकारी परमिट घेऊन चालवल्या जातात त्याच धर्तीवर या रिक्षासही Nigeria सरकारकडून परमिट/ परवाना घ्यावा लागतो. येथे रिक्षा या पिवळ्या रंगामध्ये आढळतात. मुख्यतः या रिक्षा भारतातून बजाज कंपनीकडून आयात केल्या जातात.

येथील रिक्षावाले साधारणता 2 किलोमीटर साठी 100 नायरा भाडे आकारणी करतात. शहरामध्ये गरीब किंवा मध्यम वर्गीय लोक हि रिक्षा जवळपास प्रवासासाठी वापरातात. हे Nigeria तील सर्वात स्वस्त वाहन असून Nigeria च्या वाहतुकीमध्ये या रिक्षाचा महत्वाचं वाटा आहे.

Keke Marwa म्हणजे नेमकं काय?
मलाही ह्या नावाबद्दल कुतूहल वाटायचं. म्हणून एक दिवस रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षावाल्याला विचारलं. तर त्याने त्यामागील गोष्ट उलगडायला सुरुवात केली. सन 1990 मध्ये buba Marwa नावाच्या लष्करी राज्यपालाने हि रिक्षा nigeria मध्ये प्रवासासाठी उपलब्ध करून दिली म्हणून या रिक्षाला keke Marwa असं नाव पडलं.

Nigeria मध्ये हि रिक्षा गरीब वर्गासाठी उपयुक्त आणि उपजिविकेचं साधन आहे. येथील लोक या रिक्षाला मात्र आपल्या देशी स्टाईलने सजवतात. त्यावर काहींच्या बाही मोठ्या अक्षरात लिहितात. काही जण आपल्याकडे  जसं साईबाबा प्रसन्न लिहितात त्याचप्रमाणे येथेही अशीच काही वाक्य आढळतात. 

त्यातील मुख्य वाक्य
God is great
God forgives i don't
Without god nothing
Glory of god
Don't try me o

No comments:

Post a Comment